Thursday, May 1, 2014

Thank You All....

आज खुप वर्षांनी blog लिहायला बसलो . निमित्त आयुष्याची २७ वर्ष पुर्ण झाली . मी हे सर्व लिहितोय म्हणजे मी कोणीतरी खूप मोठा celebrity आहे या भावनेने नाही . वाढदिवस सगळ्यांचाच साजरा होतो पण माझ्या आयुष्यात सध्या मी ज्या ठिकाणी पोहोचलोय तिथे येण्यासाठी ज्या लोकांचा हातभार आहे त्यांना मला या माध्यमातून फक्त thank you म्हणायचं आहे.
मागे वळून पाहताना कोणीतरी माझ बोट धरून मला इथपर्यंत आणलंय असच सारख वाटत राहत , कारण सध्या मी जिथे आहे त्याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता . लहानपणी मी मित्रांना गणित शिकवल्याच मला आठवतय , दहावीला मित्रांना जर काही शंका आल्या तर सर माझ्याकडे पाठवायचे मी त्यांना समजून सांगायचो , दहावीनंतर एका मुलाला सुट्टीत गणित शिकवलं होत , ११ वी  १२ वी  असताना एका कीर्तन शिबिरात भाग घेतला तिथे अभंग कसा प्रत्येक शब्दाच्या अर्थासहित लोकांना आवडेल अशा कथा कविता गाणी म्हणत समजून सांगायचा हे शिकवलं , engineering third year ला असताना खूप मुलांना toc शिकवल्याच आठवतय नंतर योगायोगाने lecturer चा job मिळाला आणि  teaching हे माझ profession होऊ शकत अस पहिल्यांदा वाटलं ,job ला वैतागुन काहीतरी business करावा म्हणून resign केल आणि  ठरवल कि आपण घरच हॉटेल चालवूया पण तोपर्यंत हॉटेल च्या management चा एका वर्षाचा करार हा दुसऱ्या व्यक्तीबरोबर झालेला होता मग आपण क्लासेस काढूया अस डोक्यात आल आणि कुलकर्णी क्लासेस चा जन्म झाला . पहिल्या दिवशी ५ मुल सतरंजी वर आणि मी खुर्चीवर अशी सुरवात होती . सगळेच जण मला खूप हसायचे. पण मी आधी सांगितल्या प्रमाणे कोणीतरी मला बोट धरून घेऊन चाललय अशी भावना  नक्की होती . त्यानंतर जे काही आजपर्यंत घडत गेल ते विश्वास ठेवण्यापलीकडे आहे . यावर्षी क्लासेस च्या दोन शाखा झाल्या शिर्डी आणि राहाता . दोन्ही ठिकाणी आता स्वतंत्र branch  managers व खूप मोठा staff आहे , प्रत्येक ऑफिस मध्ये प्रशस्त classrooms with benches and chairs आहेत projector interactive whiteboard biometric attendance या सर्व सुविधा असलेला पूर्ण तालुक्यातला सर्वात hightech  professional आणि यशस्वी क्लास झालाय.हे सर्व मी कुठून सुरवात केली आणि कुठे पोहोचलो याकरता सांगतोय .  एकदा आम्ही सर्व कोचिंग क्लासेस संचालक एकत्र आलो तेव्हा समजल कि सर्वामध्ये मीच वयाने सर्वात लहान आहे. हे सर्व कस घडल असेल तेही इतक्या लहान वयात ह्याचा मी जेव्हा जेव्हा विचार करतो तेव्हा फक्त एकच उत्तर मिळत आणि ते म्हणजे साईकृपा. साईबाबा समोर उभं राहिल्यावर माझा उर भरून येतो आणि लाखो वेळा माझ्या संपूर्ण शरीरातून एकच आवाज येतो thank you thank you thank you......
बाबांचं इतक प्रेम मिळायला मी खरच खूप नशीबवान आहे .
या संपूर्ण प्रवासात माझ कुटुंब माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ आहे , आई वडील भाऊ आजी या सगळ्यांनी मला वेळोवेळी मानसिक धैर्य दिल माझ्या सर्व निर्णया मागे ते ठामपणे उभे राहिले . ते सर्व घरात आहेत म्हणून मी निर्धास्त पणे माझ काम करू शकतो .
जेव्हा मी नोकरी सोडली तेव्हा माझ नुकतच लग्न जमलेलं होत त्यावेळी माझ्या निर्णयाला खूप कमी लोकांनी support केला त्यातली एक म्हणजे माझी बायको अनुजा . तिने मला माझ्या गुण दोषांसहीत स्वीकारलं आजही जेव्हा business मध्ये उतार येतात तेव्हा माझ्याबरोबर तिलाही खूप सहन कराव लागत . आवडीचा क्लास सोडून गेलेला विद्यार्थी  , मुलाचा निकाल कमी लागल्यामुळे खूप बोललेले पालक , शिक्षकांचे पगार करायचे असताना संपलेले पैसे , नवीन office करता मोडावे लागणारे दागिने हे सर्व विचार तिच्यापाशीच मोकळे होतात आणि माझ्या tensions मध्ये मला खरी अर्धांगिनी मिळते . so thank you family & anuja.........
business च्या tensions मधून जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा मी माझ्या college मित्रांना भेटतो आणि सर्व सर्व विसरून जातो . अमृता शर्वरी मधुरा मयुर तुम्ही सर्व आयुष्यात आहात म्हणून आयुष्य खूप सुंदर आहे कधी कधी वाटत कि आपण सगळे नेहमी एकत्र असाव माझे BE IT friends, माझे hostel friends आपण एकत्र घालवलेला वेळ परत यायला पाहिजे मजा येईल खूप  thank you.
माझे शिर्डी मधले मित्र संतोष विशाल मनटु शेखर सर अनिकेत सर खरतर business चालवायची शक्ती उर्जा मला तुमच्या मुळेच मिळते अस वाटत thank you
मी शिक्षक आहे पण मला सर्वात जास्त शिकवतात ते माझे विद्यार्थी. तुम्ही आहात म्हणून मला काम करत रहाव वाटत thank you
मला घडवणाऱ्या शिक्षकांना तर मी thank you म्हणूच शकत नाही मी तुमचा विद्यार्थी आहे हे तुम्ही मला कधीच जाणवू दिल नाही पटेल madam, विद्या madam,सांगळे सर , डांगे सर , राउत सर, पिंगळे madam तुम्ही मला जी शिदोरी बांधून दिलीय तीच मी विद्यार्थांना वाटतोय त्यात माझ काहीच नाही .
एका पुस्तकाच नाव घेतल्याशिवाय हा ब्लॉग  संपू शकतच नाही the secret. या पुस्तकाने मला अंधारातून फरफटत नेत प्रकाशाकडे आणल . thank you rhonda (लेखिका ) तुझ्या मुळे माझ्यासारख्या कितीतरी जणांची आयुष्य बदलली
माझ्याशी भांडलेल्या मला कमी लेखणाऱ्या मला त्रास दिलेल्या व्यक्तींना सुद्धा a big thank you. तुम्ही मला कणखर बनवलत .
एखादा चांगला सिनेमा पाहताना नाटक पाहताना कथा वाचताना काहीतरी चुकल्या सारख वाटत माझ लेखक दिग्दर्शक बनण्याचं स्वप्न अर्धवट सुटल्यासारख वाटत . पण मी कुठेतरी वाचलय if you got a dream, you have to protect it. मी हे स्वप्न जपून ठेवलय एका कोपऱ्यात . लवकरच मी हातात पेन हि घेईल आणि कॅमेरा पण…
या ब्लॉग मध्ये  मी खूप मोठा आहे वगैरे हे दाखवायचा माझा अजिबात हेतू नाही उलट मी जे काही आहे ते या सगळ्या मुळे आहे हेच मला सांगायचय . कुठे आत्मस्तुती वाटली असल्यास माफ करा . the secret मध्ये लिहिलंय ज्या गोष्टी करता तुम्ही thank you म्हणाल ती गोष्ट परत फिरून जास्त प्रमाणात तुम्हाला मिळेल.  तुमच माझ्यावरच प्रेम लाख पटींनी वाढून मला मिळू द्या . सर्वाना पुन्हा एकदा thank you thank you thank you........